Bhaubij 2023: आज, बुधवार, 15 नोव्हेंबर रोजी चंद्राचं वृश्चिक राशीनंतर धनु राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज कार्तिक मासातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण भाऊबीज (Bhaubij 2023) साजरा केला जातो. या दिवशी रवियोग, लाभ योग, सुकर्म योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, या शुभ संयोगांमुळे भाऊबीजेच्या दिवशी 4 राशींना विशेष लाभ मिळणार आहे. या राशींना व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आणि उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी आज, म्हणजेच 15 नोव्हेंबरचा दिवस लाभ योगामुळे लाभदायक ठरणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज लाभाची शक्यता आहे आणि आज त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल आणि भाऊबीजेमुले घरात खास पदार्थही तयार होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत नातं जोडण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. सासरच्या लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि त्यांच्या मदतीने तुमची अनेक कामं पूर्ण होतील. आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून केलेल्या प्रयत्नांना फळ मिळेल आणि पैशाचा ओघही चालू राहील. भावंडांसोबतचं नातं अधिक घट्ट होईल आणि तुम्ही एकमेकांसोबत मजा करण्यात वेळ घालवाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि मुलांसोबत सहलीला जाण्याची योजना करू शकता. उपजीविकेच्या क्षेत्रात तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील.


कन्या रास (Virgo)


आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी सुकर्म योगामुळे लाभदायक राहील. कन्या राशीच्या लोकांची आज सामाजिक कार्यात रुची वाढेल, ज्यामुळे त्यांना चांगला फायदा होईल. तुम्ही कुटुंबातील लहान मुलांसोबत थोडा वेळ मजा कराल आणि भाऊबीजेचा सण मोठ्या थाटामाटात साजरा कराल. कन्या राशीच्या लोकांना आज सकाळपासून एकामागून एक चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडू शकाल आणि देवाच्या दरबारातही हजेरी लावू शकाल. आज भाऊ-बहिणीकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभही मिळेल, असं दिसतं. आज भाऊबीजेमुळे नोकरदार लोक घरबसल्या काम करू शकतील, ज्यामध्ये त्यांना अधिकाऱ्यांचंही पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी संबंध चांगले राहतील आणि तुम्ही त्यांच्यासोबत जमीन खरेदी करण्याचा विचार कराल. कन्या राशीच्या लोकांना आज इतरांना मदत करण्याची संधी मिळेल.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस म्हणजे, 15 नोव्हेंबर हा शुभ योगामुळे आनंददायी जाणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असेल आणि मनाला शांती लाभेल, कारण भाऊबीजेमुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. आज तुम्ही एखाद्या मित्राला भेटू शकता, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल आणि तुम्ही बाहेर कुठेतरी जाण्याची योजना देखील करू शकता. प्रेम जीवनात असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल, तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना भेटवू शकता. नवविवाहित लोकांना आज घरात चांगली बातमी कळू शकते, ज्यामुळे कुटुंबात उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. आज भाऊबीजेच्या निमित्ताने घरी विशेष पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे चांगला आर्थिक लाभ आणि धार्मिक कार्यात रुची राहील.


धनु रास (Sagittarius)


आज म्हणजेच, 15 नोव्हेंबर ज्येष्ठ नक्षत्रामुळे धनु राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. आज धनु राशीच्या लोकांचं भाग्य उजळल्यामुळे त्यांच्या अडचणी कमी होतील आणि त्यांना अपेक्षित संपत्ती मिळेल. जर तुमचं एखादं काम पैशामुळे अडकलं असेल तर आज ते पूर्ण होऊ शकतं, ज्यामुळे तुम्ही खूप उत्साही दिसाल. नोकरदार लोकांसाठी, आज तुमची नोकरी बदलण्याची तुमची योजना यशस्वी होऊ शकते, कारण तुम्हाला मोठी संधी मिळू शकते. भाऊबीजेमुळे घरात आनंदाचं वातावरण राहील आणि भाऊ-बहिणीचं नातं अधिक घट्ट होईल. आज तुमच्या वडिलांच्या मदतीने संपत्ती मिळवण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या संपत्तीतही वाढ होईल. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळाल्यास चांगलं यश मिळेल आणि तुमचा तणावही कमी होईल. व्यवसायातील काही कामं आज पूर्ण केल्याने तुमचं मन प्रसन्न राहील आणि व्यवसायात चांगली वाढ होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Horoscope Today 15 November 2023 : आजचा बुधवार खास! फक्त 4 राशींनी टाळावं 'हे' काम; जाणून घ्या 12 राशींचं आजचं राशीभविष्य