उस्मानाबाद : उस्मानाबादच्या (Osmanabad) तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप 2020 साली अतिवृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते पण तरीही शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांकडून मदत मिळाली नाही. याविरोधात शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. औरंगाबाद खंडपीठानंही शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्या निकालाविरोधात विमा कंपनी सुप्रीम कोर्टात गेली होती.  सुप्रीम कोर्टाच्या निकालानं आज निर्णय देत शेतकऱ्यांना तीन आठवड्याच्या आत विम्याचे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत, या निकालानंतर शेतकऱ्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. 


शेतकऱ्यांचा जल्लोष


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. खरीप 2020 साली अतिवृष्टीने उस्मानाबाद  जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. आता भरपाई मिळणार असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या  या निर्णयामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. धाराशिव शहरातील शिवाजी चौकामध्ये शेतकऱ्यांनी मिठाई वाटून एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला आहे यावेळी मोठी आतिषबाजी ही करण्यात आली. या शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे व सरकारचे आभार मानले.


पीक विमा भरपाई तीन आठवड्यात देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश


उस्मानाबादच्या  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई तीन आठवड्यात देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार 287 शेतकऱ्यांना 510 कोटी रुपयाचा विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2022 मध्ये धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती .यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं असं असलं तरी सरकारने व विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत केली नव्हती. याच्या विरोधात शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. औरंगाबाद खंडपीठानेही शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. विमा कंपनी या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेली होती. सुप्रीम कोर्टाने आज आपला निकाल देताना विमा कंपनीला शेतकऱ्यांचे तीन आठवड्याच्या आत  विम्याचे पैसे देण्याच्या आदेश दिले आहेत .या निर्णयाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले  आहे.


संबंधित बातम्या :


crop insurance : 200 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे न्यायालयाचे विमा कंपनीला आदेश, मात्र ठाकरे सरकारकडून वेळकाढूपणा, आमदार पाटील यांचा आरोप 


kharif season: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत सहभागी होण्याचं शेतकऱ्यांना  आवाहन