Khelo india youth games : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही कबड्डी संघानी कबड्डीच्या मैदानावर दमदार कामगिरी केली आहे. यावेळी मुलींच्या संघाने रूपेरी यश मिळवलं असून मुलांनी कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. मुलींच्या संघाला हरियाणा संघाविरुद्ध अंतिम सामन्यात विजय मिळवता न आल्याने रौप्य पदकावर समाधान मानावं लागंल.  हरियाणा संघाने हा सामना (48-29) 19 गुणांनी जिंकत महाराष्ट्राच्या संघाला मात दिली.


दुसरीकडे महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला कांस्य पदक मिळवण्यात यश आलं. ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या मुलांना कांस्य पदक मिळाले असून यावेळी सुवर्णपदक हिमाचल प्रदेशला तर रौप्य पदक हरियाणा संघाला मिळालं आहे. तर  
मुलींच्या सामन्यांमध्ये सुवर्णपदक हरियाणा संघाने आणि रौप्य पदक महाराष्ट्राच्या मुलींनी मिळवलं. तर कांस्य पदक आंध्र प्रदेश व तामिळनाडू संघाच्या खात्यावर जमा झाले 


महाराष्ट्राच्या दर्शनची सुवर्णकामगिरी


खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राचे खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. स्पर्धेतील बॅटमिंटन खेळामध्ये महाराष्ट्राच्या (मुंबई) दर्शन पुजारी याने तामिळनाडूच्या ऋत्विक संजीवला दोन सेट्समध्ये पराभूत करत सुवर्ण पदका मिळवलं आहे. यावेळी पहिल्या सेटमध्ये 21 विरूद्ध 15 असा तर दुसरा सेट 22 विरूद्ध 20 या फरकाने जिंकला. दर्शनमुळे महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एक पदक जमा झालं आहे.


हे देखील वाचा- 



बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.