Jaadugar On Netflix : पंचायत (Panchayat) फेम अभिनेता जितेंद्र कुमारचा (Jitendra Kumar) आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जादूगर' (Jaadugar) असे या सिनेमाचे नाव आहे. 15 जुलैला हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा क्रीडाविषयक सिनेमा आहे. 

Continues below advertisement

समीर सक्सेना यांनी 'जादूगर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर पॉशम पा पिक्चर्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात जितेंद्र कुमार, जावेद जाफरी आणि अरुशी शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा क्रीडाविषयक असला तरी प्रेक्षकांना सिनेमात रोमान्सदेखील पाहायला मिळणार आहे. 

'जादूगर' सिनेमाचे कथानक हलके-फुलके आहे. या सिनेमाचे कथानक समीर सक्सेना, विश्वपती सरकार आणि जितेंद्र कुमार यांनी लिहिलेले आहे. जितेंद्र कुमारची 'पंचायत' ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. त्यामुळे प्रेक्षक आता 'जादूगर' सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

Continues below advertisement

जितेंद्र कुमारने 'जादूगर'चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिले आहे,"आता नेटफ्लिक्सवरदेखील जादू पाहायला मिळेल...कारण जादूगर येतोय. 15 जुलैला नेटफ्लिक्सवर 'जादूगर' येतोय". 'जादूगर'ची घोषणा झाल्यापासून जितेंद्र कुमारचे चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

जादूगरकुठे पाहता येणार? नेटफ्लिक्सकधी होणार रिलीज? 15 जुलै

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

संबंधित बातम्या

Panchayat 2 Web Series : फुलेरा नाही तर मध्य प्रदेशमधील 'या' गावामध्ये झालं पंचायत-2 चे शूटिंग; जाणून घ्या...

Samrat Prithviraj box Office collection : 'धाकड'नंतर 'सम्राट पृथ्वीराज' बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला; 'भूल भुलैया 2' ठरतोय सुपरहिट