(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs Ireland: आयर्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला बीसीसीआयकडून स्पेशल गिफ्ट!
India vs Ireland: मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौरा करणार आहे.
India vs Ireland: मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौरा करणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पाचवा आणि निर्णायक सामना रद्द झाल्यानं मालिका बरोबरीत सुटली. या मालिकेनंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आयर्लंडशी भिडणार आहे. या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पेशल गिफ्ट दिलंय. मालाहिडे येथे होणाऱ्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना तीन दिवसांचा ब्रेक देण्याचा बीसीसीआयनं निर्णय घेतलाय.
बीसीसीआयच्या सुत्राच्या हवाल्यानं पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, "आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेले सर्व खेळाडूंना तीन दिवसांची विश्रांती देण्यात आलीय. या मालिकेसाठी कोणतेही जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरण तयार केले जाणार नाही. परंतु खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत जाता येणार नाही." काही खेळाडू आयपीएलपासून सतत क्रिकेट खेळत आहेत आणि त्यांनी काही वेळ घरी घालवणे योग्य आहे."
आयर्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिकेतील वेळापत्रक-
सामना | दिनांक | ठिकाण |
पहिला टी20 सामना | 26 जून | डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड |
दुसरा टी20 सामना | 28 जून | डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड |
आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक
हे देखील वाचा-