India tour of England : कसोटी सामन्यांसह टी20 आणि वन डेचाही थरार, सामन्यांची वेळ, प्रक्षेपणाच्या चॅनेलसह सर्व माहिती एका क्लिकवर
England vs India : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच इंग्लंडविरुद्ध भारत सामन्यांना सुरुवात करणार आहे. यावेळी कसोटी सामन्यांसह तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामनेही खेळवले जाणार आहेत.
![India tour of England : कसोटी सामन्यांसह टी20 आणि वन डेचाही थरार, सामन्यांची वेळ, प्रक्षेपणाच्या चॅनेलसह सर्व माहिती एका क्लिकवर ENG vs IND Team india is ready for england tour know match timings and all details India tour of England : कसोटी सामन्यांसह टी20 आणि वन डेचाही थरार, सामन्यांची वेळ, प्रक्षेपणाच्या चॅनेलसह सर्व माहिती एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/5ad54613484dca20920b78343d0be59b_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ENG vs IND : जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या तोडीचा संघ असणाऱ्या इंग्लंडविरुद्ध भारत (Team India) लवकरच मैदानात उतरणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली आणि वरिष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीत इंग्लंड विरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामने भारत खेळताना दिसेल. भारताच्या मागील दौऱ्यातील एका उर्वरीत कसोटी सामन्याने या दौऱ्याची सुरुवा 1 जुलै रोजी होईल. ज्यानंतर टी 20 आणि वन डे सामनेही खेळवले जातील. तर या सर्व सामन्यांचे वेळापत्रक आणि इतर माहिती सविस्तर पाहूया...
इंग्लंड आणि भारत यांच्यात 1 ते 5 जुलै रोजी एकमेव कसोटी होणार असून त्यानंतर खालीलप्रमाणे सामने पार पडणार आहेत.
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
किती वाजता सुरु होणार सामने?
भारत आणि इंग्लंड दौऱ्यातील सर्व सामन्यांची वेळा वेगवेगळ्या असणार आहेत. यावेळी पहिला आणि एकमेव कसोटी सामना 1 जुलैला भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होईल. त्यानंतर पहिला आणि तिसरा टी20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरु होईल. तर दुसरा टी20 सामना सायंकाळी 7 वाजता पार पडेल. या सामन्यांनतर तिनही एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होतील.
कुठे पाहता येणार सामने?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामने सोनी स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामने पाहता येणार असून सोनी लिव्ह या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)