मुंबई : राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसाला 200 - 500 असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा हजारापेक्षा  जास्त आहे. तर आज राज्यातील  कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. मंगळवारी राज्याच तब्बल 1 हजार 881 रुग्ण आढळून आले आहेत.  तर मुंबईत 1242 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी हि चिंतेची बाब  आहे.


मुंबईकरांची चिंता वाढली


आज राज्यात 1881 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 878 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 1242 रुग्णांची नोंद झाली आहे.  राज्यात आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. 


आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद


राज्यात आज एकूण 878 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,39,  816  जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.02 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या 78, 96, 114 इतकी झाली आहे.


सक्रिय रुग्णसंख्या वाढली


राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 8432 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5974 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 1310  इतके सक्रिय रुग्ण आढळतात. 


 गेल्या 24 तासांत देशात 3714 नवे रुग्ण


 देशात गेल्या 24 तासांत 3714 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 26 हजार 976 वर पोहोचली आहे. सोमवारी दिवसभरात 2513 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आदल्या दिवशी 4 हजार 518 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. त्याच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे.