News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरची कोंडी फुटणार, एमएमआरडीए बदलणार हायवेचा चेहरामोहरा

मएमआरडीए प्रशासन वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतुकीच्या जलद गतीसाठी 100 कोटींची विविध कामं हाती घेणार आहे. यामुळे मुंबईतला पश्चिम उपनगरांच्या वाहतुकीसाठी सर्वात महत्वाचा असणारा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे म्हणजेच पश्चिम द्रुतगती मार्ग आता लवकरच कात टाकणार आहे.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : मुंबईतला पश्चिम द्रुतगती मार्ग म्हणजेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरुन प्रवास करणं म्हणजे सध्यातरी निव्वळ डोकेदुखी मानली जाते. वाहनचालकांना वाहतूक कोंडीत इथे तासन तास अडकून पडावं लागतं. त्यातच या मार्गावर सुरु असलेली मेट्रोची कामं आणि खड्डे यांनी वाहनचालक जेरीस येतात. मात्र आता एमएमआरडीएकडून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेचा चेहरामोहरा बदलण्याची तयारी सुरु केली आहे. एमएमआरडीए प्रशासन वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतुकीच्या जलद गतीसाठी 100 कोटींची विविध कामं हाती घेणार आहे. यामुळे मुंबईतला पश्चिम उपनगरांच्या वाहतुकीसाठी सर्वात महत्वाचा असणारा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे म्हणजेच पश्चिम द्रुतगती मार्ग आता लवकरच कात टाकणार आहे. सध्याची परिस्थिती काय वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मुंबईतील महत्त्वाच्या मार्गापैकी एक आहे. मुंबई शहर आणि उपनगराला जोडणाऱ्या या महामार्गावरून प्रति तास पाच हजार ते सात हजार वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, सध्या विविध कारणांमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरुन प्रवास करण्यास वेळ लागतो. खराब रस्ते, जंक्शनवर सिग्नल यंत्रणा नसणे, लेन मार्किंग सुस्पष्ट नसणे अशा विविध कारणांमुळे या हायवेवरुन प्रवास करण्यास वेळ लागत आहे. एमएमआरडीए काय सुधारणा करणार वांद्रे ते बोरिवली चार लेनची वाहतूक अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी विविध कामे करण्यात येणार असून त्याचा अंदाजित खर्च 100 कोटी रुपये असणार आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वांद्रे ते बोरिवली या दरम्यानचा 25 किमीचा पट्टा शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या मार्गावर वाहनचालकांसाठी सुस्पष्ट साइन बोर्ड, जंक्शन डिझाइन, उड्डाणपूलावर सहजपणे प्रवेश आणि बाहेर पडता यावे, लेन मार्किंग आदी बाबींची आवश्यकता आहे. या कामासाठी एमएमआरडीएने जागतिक पातळीवरील सल्लागाराची नेमणूक केली आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक अधिक वेगवान आणि उत्तम कशी होईल, वाहतूक कोंडी कशी टाळता येईल याबाबतही अभ्यास करण्यात येणार आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत, वेगवान व सुरक्षित होण्यासाठी सर्वंकष अभ्यास करण्यात येणार आहे. त्याशिवाय मध्यवर्ती आणि पदपथांवर ग्रीन वॉल आणि फ्लोरिंग लॅण्डस्कॅपद्वारे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याशिवाय रस्त्यावरील दिवे ही उच्च दर्जाचे असणार आहेत. जेणेकरुन वाहन चालकांना रात्रीच्या वेळी अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षित प्रवास करता येणे शक्य होणार आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी देखील पावले उचलण्यात येणार आहे. पादचारी पुलाचा वापर करणाऱ्या पादचाऱ्यांना अधिक सुरक्षित प्रवास करता यावा याकडेही लक्ष देण्यात आले आहे. उड्डाणपुलाखाली असणाऱ्या मोकळ्या जागेचे सुशोभिकरण करण्यात येणार असून आकर्षक रंगसजावटीने या भिंती रंगवण्यात येणार आहेत. त्याशिवाय प्रसाधनगृहे आणि भविष्याची गरज ओळखून ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनही वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे 11 लाख चौमी क्षेत्रावर असून 5.8 लाख चौमी भागासाठी निविदा काढण्यात आली आहे. तर, 4.8 लाख चौमीवर होणाऱ्या कामाच्या निविदा एका आठवड्यात काढण्यात येणार आहे. काही ठिकाणी क्राँक्रिटीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय खेरवाडी जंक्शनवर असणाऱ्या नाल्याचे परीक्षण एमएमआरडीए करणार असून नाल्याची ड्रेनेज क्षमता वाढवण्यात येणार आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असणाऱ्या पादचारी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले. त्याअनुषंगाने काही दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्याशिवाय वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील 25 किमी मार्गावर मुख्य रस्ता आणि पदपथांमध्ये अॅण्टी क्रॅश बॅरियर लावण्यात येणार आहेत. सर्व उड्डाणपूले स्वच्छ करण्यात येणार असून उड्डाणपूलाखालील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. त्याठिकाणचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील कलाकारांना आपली चित्रं रेखाटण्याची संधी मिळणार आहे. या कामाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार असून पायलट जंक्शनवर काम करण्यात येणार आहे. सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट लवकर सादर होणार आहे. वेस्टर्न एक्स्प्रेसवरून प्रवास करणे हा सुरक्षित आणि आनंददायी अनुभव असणार असल्याची अपेक्षा एमएमआरडीएने व्यक्त केली आहे. ही कामे सहा महिन्यात पूर्ण करण्याचा मानस एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.
Published at : 12 Dec 2019 07:16 PM (IST) Tags: express highway traffic express highway work western express highway mumbai traffic mmrda Mumbai News

आणखी महत्वाच्या बातम्या

शिवतीर्थवर राज ठाकरेंसोबत बैठक, मातोश्रीवर जाताना कार्यकर्ते म्हणाले नवीन वर्ष सत्तेचं जावो, उद्धव ठाकरे म्हणाले तथास्तू 

शिवतीर्थवर राज ठाकरेंसोबत बैठक, मातोश्रीवर जाताना कार्यकर्ते म्हणाले नवीन वर्ष सत्तेचं जावो, उद्धव ठाकरे म्हणाले तथास्तू 

BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक

BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक

राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

मुंबईत ठाकरेंचं विजयाचं गणित ठरलं? तब्बल चार तास बंद दाराआड खलबतं, नेमकी काय झाली चर्चा?

मुंबईत ठाकरेंचं विजयाचं गणित ठरलं? तब्बल चार तास बंद दाराआड खलबतं, नेमकी काय झाली चर्चा?

Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता

Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता

टॉप न्यूज़

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान

भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार