'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगीने लग्नाबाबत चाहत्यांना दिलं हटके उत्तर

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

ये रिश्ता क्या कहलाता है'या टीव्ही सीरियलने इंडस्ट्रीत तिची खास ओळख निर्माण केली आहे.

या मालिकेतून शिवांगी घरोघरी नायरा या नावाने ओळखली जाते. सोशल मीडियावर ती आपले नव-नवीन फोटो शेअर करत असते.

चाहतेही तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत असतात.

अशाच एका चाहत्याने शिवांगीला तू लग्न कधी करणार? असा प्रश्न विचाला. चाहत्याच्या या प्रश्नाला शिवानीने उत्तर दिले आहे.

शिवांगीने चाहत्यांना हटके असं उत्तर दिलं आहे. बघेन आणि विचार करेन, उद्या किंवा परवा यावर काहीतरी बोलेन, असे उत्तर देत शिवांगीने हसणारे इमोजी पाठवले आहेत.

शिवांगी जोशी आणि मोहसिन खान यांची जोडी पडद्यावर चांगलीच पसंतीस उतरली आहे.

दोघंही खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्याही येत आहेत.

(photo:shivangijoshi18/IG)