आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जनंही आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची तयारी सुरू केलीय. चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुजरातमधील सुरतमध्ये दाखल झाला आहे. चेन्नई सुपर किंग्जचे सुरतमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे. आयपीएलमधील धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत 4 वेळा स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चेन्नईच्या संघानं चौथ्यांदा विजेतेपद मिळवलंय. जेतेपद कायम राखण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे.