दिग्दर्शक यश चोप्रा यांची पहिली पत्नी आणि आदित्य चोप्रा यांची आई पामेला चोप्रा यांचे निधन झाले
त्या 85 वर्षांच्या होत्या. पामेला चोप्रा एक प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका होत्या
यासोबतच त्या चित्रपट लेखिका आणि निर्मात्या देखील होत्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पामेला चोप्रा या गेल्या 15 दिवसांपासून मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या.
डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती.
लीलावती हॉस्पिटलचे डॉ. प्रल्हाद प्रभुदेसाई यांनी एबीपीला पामेलाच्या मृत्यूची माहिती दिली
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पामेला चोप्रा यांचा मृत्यू न्यूमोनिया, श्वासोच्छवासाचा त्रास आणि मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे झाला.
आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पामेला चोप्रा यांनी 1970 मध्ये यश चोप्रासोबत लग्न केले होते.
पामेला चोप्रा यांची ओळख लेखिका-गायिका म्हणूनही होती.
यशराजच्या चित्रपटांमध्ये निर्मात्या म्हणूनही त्यांचे नाव अनेकवेळा पडद्यावर आले.