अभिनेत्री प्राजक्ता माळी चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ता चाहत्यांशी संवाद साधते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती वेगवेगळ्या आउटफिटमध्ये फोटोशूट करते. प्राजक्ताने केलेल्या फोटोशूटमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. तिनं जांभळ्या रंगाचा वन साइड ऑफ शोल्डर वन पीस ड्रेस परिधान केला आहे. या आउटफिटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. पण तिने दिलेल्या या पोजमुळे तिचं ट्रोलिंग होत आहे. प्राजू ही कोणती पोझं ग? असा प्रश्न तिला विचारण्यात आलाय. काहींनी सई ताम्हणकरसोबत राहत असल्याचा परिणाम आहे का असे म्हटले. सिंह राशीचा स्वभाव सांगणारे कॅप्शन या फोटोला दिले आहे. पण नेटकऱ्यांचे लक्ष तिच्या या पोझकडे गेले आहे.