अभिनेत्री हिना खान कायम चर्चेत असते. नुकत्याच तिने केलेल्या फोटोशूटमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एका पुरस्कार सोहळ्यात हिना खानने परिधान केलेला गाउन त्याला कारणीभूत ठरला आहे. हिना खानने सेमी ट्रान्सपरंट रेड गाउन परिधान केला होता. या आउटफिटमध्ये तिचा किलर लूक दिसून आला. ग्लोइंग मेकअप, बोल्ड रेड लिपस्टिक आणि स्लीक हेअरबनमध्ये हिना स्टनिंग दिसत होती. हिना खानचा हा स्टनिंग अंदाज काहींना खुपला. यावरून तिच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. रमजानचा पवित्र महिना सुरू असताना हिनाने असा ड्रेस परिधान करणे अनेकांना रुचले नाही. एका युजरने म्हटले की, उमराह करून काहीच फायदा झाला नाही. आणखी एका युजरने म्हटले की, ही मुस्लिमांचे नाव बदनाम करत आहे. आमची अक्षरा सूनबाई बिघडली, अशी प्रतिक्रिया एकाने दिली.