बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. आलिया भट्टने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर दोघांचे अनसीन फोटो शेअर केले आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाच्या सेटवर आलिया-रणबीरची पहिली भेट झाली होती. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळीच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट्टला ओळखले जातात. आलिया आणि रणबीरने लग्नआधी पाच वर्ष एकमेकांना डेट केलं आहे. आलिया-रणबीर एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आलिया-रणबीरला गेल्या काही दिवसांपूर्वी कन्यारत्न झालं असून त्यांनी त्यांच्या लेकीचं नाव 'राहा' ठेवलं आहे. आलियाचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि रणबीरचा 'अॅनिमल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.