भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये WTC फायनल अवघ्या काही तासात सुरु होणार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीची फायनल सात जून 2023 पासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्याचा थरार दुपारी अडीच वाजता सुरु होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहाला मिळेल डिस्नी हॉटस्टार Disney+Hotstar अॅप आणि वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहाता येईल. एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही सामन्यासंदर्भात सर्व माहिती मिळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलिया आणि भारताची तयारी जोरात सुरू आहे. या विजेतेपदासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत.