मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 50 व्या वाढदिवासानिमित्त एका चाहत्याकडून अनोखी मानवंदना.
मुंबईतील चारकोप परिसरात राहणा-या नितीन इंदुलकरनं
18 हजारहून अधिक पुश पिनांच्या सहाय्यानं सचिनचं 'मोझैक' रेखाटलंय.
विविधरंगी पुश पिनांचा वापर करून सचिनचं रेखाटलेलं हे शिल्प पाहताच क्षणी मोहून टाकतं
नितीनं पेन्सिल कार्विंगवरही आपल्या या लाडक्या दैवताचं नाव अतिशय सुबकरित्या कोरलंय.
सचिनवर आज त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त जगभरातून चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना.
नितीनसारखे काही फैन्स आपल्या कलेतून क्रिकेटच्या या देवाला आपली मानवंदना वाहताना पाहायला मिळतायत.
Sachin Tendulkar सचिन तेंडुलकर आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.
आज सचिनने त्याच्या वयाची हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे.
आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत सचिनने अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केले आहेत.