WTC 2023 : रहाणेनंतर रिद्धिमान साहाची टीम इंडियामध्ये एंट्री? केएल राहुलच्या जागी संधी मिळण्याची शक्यता, दमदार खेळीचं कोहलीकडूनही कौतुक



आयपीएल 2023 मधील रिद्धिमान साहा दमदार फॉर्म पाहता अजिंक्य रहाणेप्रमाणेच साहाचीही टीम इंडियात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



आयपीएलच्या 51 व्या सामन्यात गुजरातचा फलंदाज रिद्धिमान साहाचा दमदार फॉर्म पाहायला मिळाला. रिद्धिमानच्या तुफान अर्धशतकी खेळीनं सर्वांचंच लक्ष वेधलं.



साहाने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 43 चेंडूत 81 धावांची उत्कृष्ट खेळी केली. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले.



लखनौ विरुद्धच्या सामन्याच रिद्धिमान साहाने वायूवेगाने धावा जमवल्या आणि गुजरात टायटन्सचा सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला.



रिद्धिमानचा हा दमदार फॉर्म पाहता अजिंक्य रहाणेप्रमाणेच साहाचीही टीम इंडियात पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



आगामी काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे.



याआधी टीम इंडियावर टांगती तलवार आहे. टीम इंडियामागे दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. अनेक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.



लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला 1 मे रोजी इकाना स्टेडियमवरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधातील सामन्यादरम्यान जखमी झाली. त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे.



यानंतर राहुल आयपीएल 2023 मधून बाहेर पडला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दुखापतीमुळे केएल राहुलला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीलाही मुकावं लागणार आहे.



लंडनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC चा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे.



केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून बाहेर पडल्यास त्याच्या जागी साहाला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.