महिला कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी चिरडले
दिल्लीच्या जंतरमंतरवर जोरदार गोंधळ; साक्षी मलिकसह कुस्तीपटू ताब्यात
पोलिसांनी आता आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
दिल्लीच्या जंतर-मंतर येथून नवीन संसदेसमोर महापंचायत भरवायला निघालेल्या पैलवानांना पोलिसांनी अडवलं.
त्यानंतर पोलीस आणि आंदोलक पैलवानांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी पैलवानांना ताब्यात घेतलं.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे मोर्चा वळवला
नवीन संसद भवनाकडे आगेकूत करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी अडवलं.
यावेळी कुस्तीपटूंनी पोलिसांचे बॅरिकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेक पैलवानांना ताब्यात घेण्यात आलं
पोलिसांनी रोखल्यानंतर कुस्तीपटू केरळ हाऊसजवळ ठिय्या मांडून बसले आहेत.
येथून संसद भवन हाकेच्या अंतरावर आहे.