नवी दिल्ली येथे नव्या संसद भवनाची भव्यदिव्य अशा इमारतीने आकार घेतला आहे.

नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी करण्यात येणार आहे

या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी करण्यात येईल

होम-हवनापासून ते राजदंडाची प्रतिष्ठापना करण्यापर्यंतचे सर्व विधी या उद्घाटनाच्या वेळी करण्यात येणार आहेत.

या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

ही संसदेची नवी इमारत चार मजली आहे तर या संसदेला सहा प्रवेशद्वार आहेत.

या संसद भवनात लोकसभेचे 1000आणि राज्यसभेचे जवळपास 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

नव्या संसद भवनात प्रत्येकासमोर छोटे बाक असतील

तसेच या बाकांमध्ये हजेरी,मतदान तसेच भाषांतर ऐकण्यासाठी आत्याधुनिक सुविधा असतील

याशिवाय या संसद भवनात 120 कार्यालयं आणि म्युझियम तसेच गॅलरीही असतील