ट्रम्प यांच्या पुनरागमनाने क्रिप्टोकरन्सीमध्ये वाढ दिसत आहे.
बिटकॉइनसह अनेक चलनांच्या किंमती वाढल्या. डॉजकॉइनमध्ये 20% हून अधिक वाढ झाली.
ट्रम्पचा विजय डिजिटल मालमत्ता क्षेत्राला खूप पुढे नेऊ शकतो या कारणांमुळे वाढ झालेली दिसते.
निवडणूक प्रचारात त्यांनी अमेरिकेला जागतिक क्रिप्टो हब राजधानी बनवण्याचे आश्वासन दिले होते.
आज बुधवारी (दि. 06/11/2024) सकाळी 11 वाजेपर्यंत बिटकॉइनच्या किमतीत 8% हून अधिक तेजी नोंदवली.
अमेरिकन उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची आवडती क्रिप्टोकरन्सी, 20% पेक्षा जास्त झेप घेऊन 0.20 डॉलर्स (रु. 17.19) झाली आहे.
एलन मस्क यांची सर्वात आवडती क्रिप्टोकरन्सी डॉजकॉइन मानली जाते.
अमेरिकेतील या निवडणुकीत क्रिप्टोकरन्सीवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी क्रिप्टो क्षेत्राच्या विकासाला पाठिंबा दिला.
ट्रम्प यांनी निवडणुकीतील जाहीरनाम्यात प्रो-क्रिप्टो अजेंडाचे आश्वासन दिले होते.