हे आहेत भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार देश...

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Google

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मते, सध्याच्या आर्थिक वर्षातील भारताचे टॅाप 10 ट्रेडिंग पार्टनर्स भारताच्या एकूण व्यापाराच्या 51% प्रतिनिधित्त्व करतात.

तर मागील वर्षी, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये( GDP) परकीय व्यापाराचा वाटा अंदाजे 46% होता.

Image Source: Unsplash

जाणून घ्या, भारताच्या सर्वात मोठ्या ट्रेडिंग पार्टनर्स विषयी!

Image Source: Google

1. अमेरिका

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2024-25 मध्ये सलग चौथ्या वर्षी अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिला आहे.
तर दोन्ही देशांदरम्यानएकूण 131.84अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला.

Image Source: VP/X

2. चीन

चीन हा विशेषतः आयातीच्या बाबतीत भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे. 2023-24 मध्ये 118.4अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 2024-25 मध्ये 121.7 अब्ज डॉलर्सच्या द्विमार्गी व्यापारासह चीन हा भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.

Image Source: MEA Photo Gallery

3. संयुक्त अरब अमिरात

गेल्या आर्थिक वर्षात, 100.5 अब्ज डॉलर्ससह युएई भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता.

Image Source: Defence Ministry via PTI Photo

4. रशिया

भारत आणि रशियामधील द्विपक्षीय व्यापार 2023-24 या आर्थिक वर्षात 65.7 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला, जो वार्षिक तुलनेत 33% जास्त आहे आणि महामारीपूर्वीच्या 10.1अब्ज डॉलर्सच्या व्यापारापेक्षा जवळजवळ 5.5 पट जास्त आहे.

Image Source: IANS

5. सौदी अरेबिया

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या सुमारे 20% कच्चे तेल सौदी अरेबिया मधून आयात करतो.
फेब्रुवारी 2024ते फेब्रुवारी 2025यान भारताची सौदी अरेबियामध्ये निर्यात ही 1.06 अब्ज डॅालर्स तर आयात 2.16 अब्ज डॅालर्स येवढी राहिली.

Image Source: X/@MEAIndia

6. सिंगापूर

2023-24 दरम्यान देशांचा 35.61 अब्ज अमेरिकन डॉलर्स होता.आर्थिक वर्ष २४ मध्ये भारताची सिंगापूरला निर्यात 14.41अब्ज अमेरिकन डॉलर्स होता.

Image Source: facebook