IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही जागतिक संघटना असून जागतिक आर्थिक सहकार्य,आर्थिक स्थिरता,आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे आणि आर्थिक वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी कार्यरत आहे.
त्यानंतर, बांग्लादेशलाही त्यांच्या ४.७अब्ज डॅालर्स कर्ज कार्यक्रमाच्या चवथ्या आढाव्यानंतर १.३अब्ज डॅालर्स जारी करणार आहे.
अर्जेंटिनावर आयएमएफचे सर्वाधिक म्हणजे एकूण ४०.२६ अब्ज डॅालर्स कर्ज आहे. यामध्ये नुकत्याच एप्रिल २०२५ मध्ये मंजूर झालेल्या २०अब्ज डॅालर्स निधीचाही समावेश आहे.
युक्रेन हा आयएमएफचे सर्वाधिक कर्जप्राप्त होणारा दुसरा मोठा देश आहे. यानुसार युक्रेनवर एकूण १०.८अब्ज डॅालर्स एवढे कर्ज आहे. यामध्ये मार्च २०२३ ला मंजूर झालेल्या आयएमएफच्या ४८ महिन्यांचा विस्तारित निधी सुविधा (EFF) अंतर्गत असलेल्या ११.६ अब्ज एसडीआरचा देखील समावेश आहे.
आयएमएफचे इजिप्तवर एकूण ८.२अब्ज डॅालर्स एवढे कर्ज आहे. हे कर्ज आयएमएफच्या विस्तारित निधी सुविधेचा भाग असून या आकडेवारीत अलिकडेच मार्च २०२४ मध्ये मान्य झालेल्या १.२ अब्ज डॉलर्सचा समावेश आहे.जो ८अब्ज एक्सटेंडेड फंड फॅसिलिटीचा ४था भाग आहे.
पाकिस्तान आयएमएफकडून सर्वाधिक कर्ज घेणारा ४था देश आहे.ज्यानुसार पाकिस्तानवरील एकूण कर्ज ६.८६अब्ज डॅालर्स एवढे आहे. यामध्ये नुकत्याच मे २०२५ च्या सुरूवातीला मंजूर झालेल्या १ अब्ज डॅालर्सच्या विस्तारित निधी सुविधेअंतर्गत तात्काळ कर्ज वाटपाचा समावेश आहे.