उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू झाली आहे.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मार्च रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.



या बैठकीत योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी औपचारिक निवड करण्यात येणार आहे.



त्यांच्या नावावर सर्व आमदार सहमत होतील आणि त्यानंतर 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.



मिळालेल्या माहितीनुसार, रघुवर दास यांच्या उपस्थितीत लोकभवनात 24 मार्च रोजी दुपारी 4 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.



या बैठकीत योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात येणार आहे.



या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांबाबतही निर्णय होऊ शकतो.



यानंतर 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा लखनौमधील शहीद पथावरील एकना स्टेडियमवर होणार आहे. त्याची जय्यत तयारीही सुरू झाली आहे.