दिलबर गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. नोरानं अनेक आयटम साँगमध्ये काम केले आहे. हार्डी संधूच्या 'नाह' या गाण्यामुळे नोराला विशेष लोकप्रियता मिळाली. रिपोर्टनुसार नोरा एका गाण्यात काम करण्यासाठी 40 लाख मानधन घेते. जेव्हा गार्मी हे गाणे हिट झाले तेव्हा नोरानं तिचे मानधन वाढवले. एखाद्या जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी नोरा पाच लाख रूपये मानधन घेते. नोराची एकूण संपत्ती 12 कोटी रूपये आहे. नोरा दरवर्षी दोन कोटी रूपये कमावते.