जसे शारीरिक आजार असतात तसेच मानसिक आजारसुद्धा असतात.



स्किझोफ्रेनिक रुग्णांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा उद्देश आहे.



दरवर्षी 24 मे रोजी हा दिन पाळला जातो.



याची काही लक्षणे जसे की, भ्रम (Hallucination) : ऐकणे, पाहणे किंवा नसलेल्या गोष्टी जाणवणे.



असामान्य वर्तन (Abnormal behavior): विचित्र वर्तन जसे की विनाकारण भटकणे, स्वतःशी हसणे, विचित्र दिसणे, इ.



स्किझोफ्रेनिया हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. यासाठी मानसोपचारतज्ज्ञांशी संपर्क साधून ट्रीटमेंट फॉलो करणे हा उपचार आहे.



संबंधित व्यक्तीशी योग्य संवाद साधून तसेच चांगले वातावरण निर्माण करूनही यावर मार्ग काढता येऊ शकतो. परंतु. तज्ज्ञांचा सल्ला हाच यावर योग्य उपचार आहे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.