तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी या मालिकेच्या चाहत्यांना आता आनंदाची बातमी दिली आहे.



शोमध्ये आता पुन्हा जेठालाल आणि दया यांची जोडी गोकुलधाममध्ये धुमाकूळ घालताना दिसणार आहे.



असित मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'दयाबेन ही भूमिका परत मालिकेत न आणण्याचं आमच्याकडे कोणतही कारण नाही.'



पुढे ते म्हणाले, '2020 आणि 2021 हा अनेकांसाठी कठिण काळ होता. '



'आता 2022 मध्ये चांगल्या काळाची सुरूवात झाली आहे. आता लवकरच दया तुमच्या भेटीस येणार आहे. आता प्रेक्षक पुन्हा दया आणि जेठालालची जोडी पाहू शकणार आहेत.' असं त्यांनी सांगितलं.



पुढे ते म्हणाले, ' दिशा वकानी ही दयाची भूमिका साकारेल की नाही? हे मी सांगू शकत नाही. '



28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.



मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे



मालिकेमधील कलाकारांची विनोदी शैली नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.




आता दयाला पुन्हा शोमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.