मुंबई आणि जगभरातील किनारपट्टी भागातील शहरांसाठी धोका असल्याचा अंदाज जागतिक हवामान संघटनेने वर्तवला आहे हवामान बदल आणि त्यातून घडणाऱ्या बदलांचे संकेत मिळत असल्याचे हवामान संघटनेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुळे किनारपट्टी भागातील शहरांसाठी धोक्याची घंटा वर्तवण्यात येत आहे. हवामान बदलामुळे मुंबईतील काही भाग 2050 पर्यंत पाण्याखाली जाणार असा अहवाल गेल्या काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आला होता. मात्र, ही वेळ आणखी लवकर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान बदलामुळे मुंबई, शांघाय, ढाका, बॅंकॉक, जकार्ता, मापुटो, लागोस, कैरो, लंडन, कोपनहेगन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, ब्युनोस आयर्स आणि सॅंटियागोसारख्या मोठ्या शहरांना धोका आहे. हवामान बदलामुळे दक्षिण मुंबईतील काही भाग पाण्याखाली जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता त्यातच आता जागतिक हवामान संघटनेकडून पुन्हा एकदा वाढत असलेल्या समुद्र पातळीबद्दल सूचक इशारा दिल्याने आताच सावध होण्याची गरज असल्याच तज्ज्ञांचे मत आहे.