अबुधाबीमधील पहिल्या 'हिंदू' मंदिराचा 'पीएम मोदीं' च्या हस्ते 14 फेब्रुवारी रोजी उद्घाटन सोहळा पार पडला. (Photo Credit : PTI)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील पहिलं हिंदू मंदिर असलेल्या अबुधाबीमध्ये (BAPS) च्या हिंदू मंदिराचे लोकार्पण केले. (Photo Credit : PTI)
मंदिर लोकार्पणापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरात आभासी गंगा आणि यमुना नद्यांमध्ये जल अर्पण केले. (Photo Credit : PTI)
यानंतर मंदिराच्या प्रार्थना करण्यासाठी पंतप्रधान मोदी मार्गस्थ झाले. (Photo Credit : PTI)
अबू धाबीमध्ये 27 एकरच्या जागेवर गुलाबी वाळूच्या दगडातील मंदिर आहे, जे मध्य पूर्वेतील सर्वात मोठे मंदिर आहे. (Photo Credit : PTI)
इस्लाम हा UAE चा अधिकृत धर्म असताना, देशात सुमारे 36 लाख भारतीय कामगार राहतात. (Photo Credit : PTI)
मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांच्या यादीत भारतीय सरकारी अधिकारी, बॉलीवुड तारे आणि अब्जाधीश अंबानी कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. (Photo Credit : PTI)
मंदिराच्या उद्घाटन समारंभाला अबुधाबीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. (Photo Credit : PTI)
अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुराणचा उल्लेख केला. (Photo Credit : PTI)
दुबई-अबू धाबीतील हे मंदिर शेख झायेद महामार्गावरील अल रहबाजवळ 27 एकर जागेवर सुमारे 700 कोटी रुपये खर्चून हे मंदिर बांधण्यात आले आहे. (Photo Credit : PTI)