अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश आज केला आहे , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षसदस्यावर सही घेऊन प्रवेश दिला, ( Image Credit- Mumbai Reporter )
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ( Image Credit- Mumbai Reporter )
आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. राज्यातलं एक जेष्ठ नेतृत्त्व भाजपमध्ये प्रवेश करत आहे. ज्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूक गाजवली. ( Image Credit- Mumbai Reporter )
विविध मंत्रीपद भूषवली, दोनवेळा जे राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते अशोक चव्हाण आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ( Image Credit- Mumbai Reporter )
मोदीजींनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं काम सुरू केलंय. त्यामुळेच देशातील अनेक नेत्यांना आज मोदीजींसारख्या मजबूत नेतृत्त्वासोबत यावसं वाटतंय, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. ( Image Credit- Mumbai Reporter )
विरोधात आणि सत्तेत असताना देखील आमचे राजकारणापलीकडे सबंध होते. विकासाची राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिलीय. ( Image Credit- Mumbai Reporter )
हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा असे सांगितले नाही. मी अधिक भाष्य करणार नाही, योग्य वेळी बोलीन, असे अशोक चव्हाण म्हणाले. ( Image Credit- Mumbai Reporter )
गेल्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करतोय, असे अशोक चव्हाण म्हणाले. आयुष्याची मी नवी सुरुवात करतोय., भाजपच्या ध्येयधोरणांनुसार कां करणार असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. ( Image Credit- Mumbai Reporter )
विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस नेहमी सकारात्मक राहिले, आम्हाला साथ दिली. ( Image Credit- Mumbai Reporter )
मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करू, असे अशोक चव्हाण म्हणाले. ( Image Credit- Mumbai Reporter )