सर्वात आधी चॉकलेट बनवण्यासाठी गॅसवरती डबल बॉयलर ठेवून पाणी गरम करा. पाणी गरम झाल्यानंतर त्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी नारळाचे तेल घाला. नारळाचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली साखरेची पावडर घालावी. त्यानंतर या मिश्रणात दूध पावडर आणि कोको पावडर घाला आणि सर्व छान एकत्र करून घ्या. त्यानंतर या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स घाला. मिश्रण एकजीव झाल्यावर तुमच्या आवडीनुसार त्यात ड्रायफ्रूट्स घाला. त्यानंतर चॉकलेट मोल्डमध्ये हे मिश्रण घाला. ३ -४ तास चॉकलेट मोल्ड फ्रीजमध्ये ठेवावे. अशाप्रकारे आपण अगदी सहजसोप्या पद्धतीने चॉकलेट बनवू शकतो. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.