मासिक पाळीच्या वेळी हार्मोन्समध्ये होणारे बदल त्वचेवरही परिणाम करतात.
फॉलिक्युलर फेज मध्ये इस्ट्रोजेन हार्मोनमध्ये हळूहळू वाधत असल्यामुळे त्वचा कोरडी पडते.
ओव्हुलेशन फेज मध्ये अंड्यांची निर्मित होत असल्या कारणाने इस्ट्रोजेनची पातळी उच्च होते त्यामुळे त्वचा मुलायम दिसते
ल्युटल फेजमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे त्वचेचा तेलकटपणा वाढू लागतो.
3-5 दिवस मासिक पाळी सुरू होते. यावेळी त्वचेची संवेदनशीलताही वाढते.
त्वचेची काळजी कशी घ्यावी?
ओव्हुलेशन फेज मध्ये सौम्य क्लिन्झर, कोलेजन बूस्टिंग मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरा.
ल्युटेल फेज मध्ये त्वचा तेलकट होते त्यामुळे सॅलिसिलिक ॲसिडसारख्या तेल कमी करणाऱ्या उत्पादनांचा वापर करा
मासिक पाळी मध्ये त्वचेवर पुरळ येण्याची शक्यता असते. त्यामुळे सॅलिसिलिक ॲसिड, टी ट्री ऑइल इत्यादींचा वापर करा.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )