वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात आणि हार्मोन्समध्ये अनेक बदल होतात.
वाढत्या वयानुसार महिलांमध्ये अनेक आजारांचा धोकाही वाढतो.
महिलांनी हार्मोन्सचं संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे.
शरीरातील हार्मोन्सचा परिणाम हाडांच्या आरोग्यावर होतो.
इस्ट्रोजेनमुळे हाडांची निर्मिती होत असल्यामुळे,इस्ट्रोजेन हे हार्मोन्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
स्त्रियांमध्ये एकूण दोन प्रकारे हाडांचा कर्करोग होतो.
हाडांच्या कर्करोगाचा धोका कसा वाढतो?
हार्मोनल बदलांमुळे इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
कौटुंबिक इतिहासामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
बालपणात रेडिएशनद्वारे काही उपचार केले असतील तर कर्करोगाचं निदान होण्याआधी उपचार होण्याची शक्यता वाढते.
महिला अनेक प्रकारे आपली हाडे निरोगी ठेवू शकतात आणि हा धोका टाळू शकतात.
कुटुंबातील कोणाला कॅन्सरची लागण झाली असल्यास वेळोवेळी स्वतःची तपासणी करून घ्यावी.
निरोगी आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे.
हार्मोन्सशी संबंधित समस्या शारीरिक व्यायामाने दूर होऊ शकतात.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )