गर्भावस्थेत जास्त भूक का लागते

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

गर्भावस्थेत सर्वात जास्त भूक साधारणपणे दुसऱ्या तिमाहीत (जवळपास ४-६ महिने) खूप लागते.

Image Source: pixabay

गर्भावस्थेत महिलांच शरीर बाळाला आधार देण्यासाठी अधिक मेहनत घेतं.

Image Source: pixabay

गर्भावस्थेत स्त्रियांना भूक जास्त लागते, हे चांगले लक्षण मानले जाते.

Image Source: pixabay

यामुळे हे समजते की गर्भातील शिशुला योग्य आहार मिळत आहे

Image Source: pixabay

गर्भावस्थेत प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन सारख्या हार्मोन्सची पातळी वाढते आणि घटते, ज्यामुळे भूक वाढते.

Image Source: pixabay

गर्भावस्थेत महिलांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण 40-50% पर्यंत वाढते, ज्यामुळे अतिरिक्त ऊर्जेची गरज भासते.

Image Source: pixabay

महिलांच्या गरोदरपणात शरीराची चयापचय क्रिया (metabolism) वाढते, ज्यामुळे जास्त कॅलरीजची आवश्यकता असते.

Image Source: pixabay

गर्भावस्थेत मॉर्निंग सिकनेस कमी झाल्याने आणि बाळाची जलद वाढ होत असल्यामुळे भूक अचानक वाढते, याला बहुतेक वेळा गर्भधारणेचा हनीमून पीरियड म्हणतात.

Image Source: pixabay

महिलांना गरोदरपणात भूक लागते, पण गर्भाशय मोठे झाल्याने पोटावर दाब येतो, ज्यामुळे थोडे खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते.

Image Source: pixabay