काय आहे जाणून घ्या भारतीय रेल्वेची नवी मोहीम?
भारतीय रेल्वेचा (Indian Railway) प्रवास हा सर्वात सुरक्षित आणि आरामदायी समजला जातो.
महिला जेव्हा रेल्वेने प्रवास करतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात.विशेषत: जेव्हा महिला एकटी प्रवास करते.
सुरक्षेचा विचार करून भारतीय रेल्वेने 'मेरी सहेली' मोहीम हाती घेतली आहे.
महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी उत्कृष्ट मोहीम आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक महिलेला या मोहिमेचा फायदा होत आहे.
मेरी सहेली अभियानाच्या टीममध्ये फक्त महिलाच असतात. या टीमच्या माध्यमातून रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) टीम महिला प्रवाशांमध्ये जागृती करते आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांकडून माहिती गोळा करते.
महिलांनो... 182 क्रमांक लक्षात असू द्या.
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मेरी सहेली टीम एकट्या प्रवास करणाऱ्या महिलेला सुरक्षा तर देतेच, पण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी टिप्सही देते.
जर एखाद्या महिला प्रवाशाला ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या आली, तर ती रेल्वे सुरक्षा दलाच्या 182 क्रमांकावर कॉल करून माहिती देऊ शकते.
ही मोहीम मुंबई सेंट्रल – जयपूर आणि वांद्रे टर्मिनस – अमृतसर या गाड्यांवर पाहता येईल. याशिवाय बिहारमधील अनेक मार्गांवर महिलाही या मोहिमेचा लाभ घेऊ शकतात.