जर तुम्हाला तुमची त्वचा चांगली हवी असेल,

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexel

तिचा पोत चांगला हवा असेल तर तुम्ही ड्राय फ्रूट्स खावेत.

Image Source: Pexel

​खजूराचे फायदे

खजूरमध्ये जीवनसत्त्व अ आणि ब असते. ते त्वचेची लवचिकता सुधारतात आणि कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. विशेषत: सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर करण्यासाठी खजूर उपयुक्त ठरू शकतात.

Image Source: Pexel

पिस्ता

पिस्त्यात व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे त्वचेचे नुकसान कमी होते. हे कोरडेपणा कमी करू शकते आणि आपली त्वचा तरुण बनवू शकते. त्यामुळे हे सर्व फायदे मिळवण्यासाठी हे ड्रायफ्रूट्स खा.

Image Source: pexel

मनुका

मनुकामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे काळे डाग आणि पुरळ कमी करतात.

Image Source: Pexel

काळे मनुके त्वचेचे डिटॉक्सिफाई आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे चांगल्या त्वचेसाठी भिजवलेले मनुके खा.

Image Source: Pexel

​काजूचे फायदे

काजूमध्ये लोह, फॉस्फरस, जस्त, तांबे, व्हिटॅमिन सी आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असते. हे कोलेजन पातळी सुधारण्यास मदत करतात. हे प्रोटीन त्वचेला तरुण ठेवते आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

Image Source: Pexel


अक्रोडचे फायदे

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात. अक्रोड पेस्ट एक उत्कृष्ट एक्सफोलिएटिंग स्क्रब म्हणून वापरली जाऊ शकते. हे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करतात, सुरकुत्या कमी करतात आणि तुमची त्वचा चमकतात.

Image Source: Pexel

​बदाम

बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात. ते त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे सकाळी लवकर भिजवलेले बदाम खाल्ल्याने त्वचेवर चमक येईल

Image Source: Pexel

टीप :

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही