आवळा फळाची गोड आणि आंबट चवही आरोग्यासाठी तितकीच फायदेशीर असते. आवळा पाणी प्यायल्याने वजनही नियंत्रित राहते. रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने शरीराचे डिटॉक्सिफाईड चांगले होते. हिवाळ्याच्या थंडीतही याचे सेवन करू नये. कारण आवळ्याची चव थंड असते. जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया होणार असेल तर ते अजिबात खाऊ नका. कारण यातील अँटीप्लेटलेट गुणधर्म रक्तस्रावाची समस्या वाढवू शकतात. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या दोन आठवडे आधी आवळा खाणे बंद करा. रक्तातील साखर कमी असतानाही आवळा खाऊ नये. यामुळे हायपोग्लायसेमियाचा धोका वाढू शकतो. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.