दुधीची चव तुम्हाला वाईट वाटत असली तरी ती तुमच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल तर दुधीचा रस प्या. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. दुधीच्या रसामध्ये नैसर्गिक साखर असते. जी ग्लायकोजेनची पातळी राखण्यासाठी उपयुक्त असते. तुम्हाला युरिन इन्फेक्शनची समस्या असेल आणि तुम्हाला वेदना होत असेल तर तुम्ही यासाठी दुधीचा रस पिऊ शकता. दुधीचा रस रिकाम्या पोटी प्यायल्यास शरीराला ताजेपणा येतो. दुधीमध्ये 98 टक्के पाणी आणि अँटी - ऑक्सिडेंट असतात जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांच्यासाठीही दुधीचा रस खूप फायदेशीर आहे. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.