काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी-6, सी, के, आयर्न, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं.



काजू खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा तर वाढतेच पण त्याचबरोबर अनेक आराजांपासून आपलं रक्षणदेखील होतं.



काजू मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी अत्यंत परिणामकारक ठरतं.



काजू खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती, एकाग्रता तर वाढतेच. पण, त्याचबरोबर मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास होत नाही.



नैराश्यावर देखील काजू खाण्याचा सल्ला दिला जातो.



काजूमध्ये हेल्दी फॅटचं प्रमाण खूप चांगलं आहे. त्यामुळे हृदयविकार, डायबिटीस आणि कॅन्सरवर मात करता येते.



काजू खाल्ल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते. आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास देखील मदत होते.



काजू आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवतं.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.