रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फायदेशीर आहे. उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी बदाम खाल्ल्यास नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. मधुमेह असल्यास रात्री पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने थकवा दूर होतो. बदाम खाल्ल्याने शरीरातील शुगर आणि इन्सुलिनचे प्रमाण वाढत नाही. बदामामुळे पचन सुधारते. त्याचप्रमाणे लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते. बदामातील अॅन्टीऑक्सिडेंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. भिजवलेले बदाम नियमित खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.