केसांची जर योग्य निगा राखली नाही तर केस पातळ होऊ लागतात. ही परिस्थिती हळूहळू केस गळण्याचे कारण होऊ शकते.



हिवाळ्यात केसांची योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा थेट परिणाम केसांच्या वाढीवर होतो. केसांची जर योग्य निगा राखली नाही तर केस पातळ होऊ लागतात.



ही परिस्थिती हळूहळू केस गळण्याचे कारण होऊ शकते. म्हणूनच हिवाळ्यात तुमच्या केसांचे प्रमाण कोणत्या कारणांमुळे कमी होते याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.



तुम्ही हिवाळ्यात हेअर कंडिशनर जास्त वापरत असाल तर तुम्हाला पातळ केसांच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.



हेअर कंडिशनरच्या जास्त वापरामुळे केसांना फायदा होण्याऐवजी नुकसान होते. हेअर कंडिशनर देखील एका मर्यादेत वापरावे तरच केसांना फायदा होतो.



हिवाळ्यात प्रत्येक वेळी शॅम्पू करताना कंडिशनर वापरू नका. केसांमध्ये ओलावा टिकवण्यासाठी तेल लावा.



केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावा, चांगलं मसाज करा आणि कमीत कमी अर्धा तास ठेवल्यानंतर शॅम्पू करा. त्यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहून केसांचं प्रमाणही वाढू लागतं.



हिवाळ्यात केसांशी संबंधित दुसरी सर्वात सामान्य चूक म्हणजे गरम पाण्याने केस धुणे. लक्षात ठेवा की, केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. गरम पाण्याने केसांची मुळे पूर्णपणे कोरडी होतात.



आठवड्यातून किमान दोनदा केसांना तेल लावावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवणे. हर्बल शैम्पूचा वापर करणे.