सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनामध्ये अनेकांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. यामुळे लठ्ठपणा आणि त्यासंबंधित आजारांना आमंत्रण मिळतं.



वाढत्या वजनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह यासंह इतर आजारांचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहणं फार गरजेचं आहे.



वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. काही जण व्यायाम करुन घाम गाळतात, तर काही जण डाएटिंगवर लक्ष केंद्रीत करतात.



पण तुम्हाला याहून सोप्या उपायाबद्दल माहित नसेल. या साध्या उपायामुळे तुम्ही सहज तुमचं वजन नियंत्रित करु शकता. हा उपाय कोणता ते वाचा.



झोपेचा तुमच्या वजनावर फार मोठा परिणाम होतो. नियमित आणि पुरेशी झोप यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहतं.



हो हे खरं आहे. वजन नियंत्रित करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे पुरेशी झोप.



पुरेशी झोप घेतल्याने तुमचं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. हा सोपा पण प्रभावी उपाय आहे. दररोज सुमारे 7 ते 8 तास झोपं घेणं आवश्यक आहे.



तुम्ही कितीही व्यस्त असाल तरी झोपेकडे दुर्लक्ष करू नका. किमान सहा तास किंवा त्याहून अधिक झोप शरीरासाठी आवश्यक आहे.



नऊ तासांपेक्षा अधिक झोप चांगली नाही. योग्य पुरेशी झोप घेतल्याने तुमची पचनक्षमता सुरळीत राहते.



सुर्योदयानंतर झोपून राहू नका. जेवल्यानंतर लगेचच झोपू नका. झोपण्याआधी किमान दोन तास काहीही खाणं टाळा.