हिवाळ्यात शारीरिक हालचालींचा अभाव झाल्यानं हृदयाच्या समस्यांपासून मानसिक आरोग्यापर्यंत अनेक समस्या उद्भवू शकतात.
एका जागी बसण्याच्या या सवयीमुळे तुम्हाला हळूहळू इतर आजारांचा धोका वाढू शकते.
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली खूप महत्त्वाच्या आहेत.
थंडीमध्ये आपण अधिक सुस्त होईन जातो. अनेकांना घराबाहेर पडण्याची किंवा थंडीत व्यायाम करण्याची इच्छा नसते. पण हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला हालचालीची अधिक गरज असते.
हिवाळ्यात सुस्त जीवनशैलीमुळे होणारे शरीर दुखणं टाळण्यासाठी दर दोन तासांनी 5 मिनिटे चालावं.
जर तुम्ही नेहमी कामामुळे बसलेले असाल तर तुम्ही थोड्या-थोड्या अंतराने हालचाल करत राहा. एका जागी बसून राहू नका.
हिवाळ्यामध्ये लोक पाणी कमी पितात. हे करणं शरीरासाठी हानिकारक आहे. हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे निर्जलीकरण, थकवा आणि वेदना होतात.
दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पिणं महत्त्वाचं आहे. गरम चहा किंवा सूप प्यायल्यानेही शरीरातील उष्णता वाढवण्यास मदत होईल.
उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. ताजी फळे, भाज्या, कडधान्ये यांचा आहारात समावेश करा.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि तुमचं संक्रमण आणि इतर आजारांपासून संरक्षण होईल. हिवाळ्यात जंक फूड आणि तेलकट अन्न खाणे टाळा.