विम्बल्डन 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्बियाचा अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविचनं (Novak Djokovic) ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसला (Nick Kyrgios) मात देऊन कारकीर्दीतील 21व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरलंय.



विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याची ही जोकोविचची सातवी वेळ आहे.



या विजयासह जोकोविचनं स्विझरलँड स्टार टेनिसपटू रॉजर फेडररचा (Roger Federer) आणखी एक विक्रम मोडलाय.



सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाच्या बाबतीत नोवाक जोकोविचनं रॉजर फेडररला मागं टाकलंय.



जोकोविचनं सलग चौथ्यांदा विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय.



या विजयासह जोकोविचच्या नावावर 21 ग्रँड स्लॅम जिंकण्याची नोंद झालीय.



रॉजर फेडररनं त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत आतापर्यंत 20 ग्रँड स्लॅम जिंकली आहेत.



ऐतिहासिक सेंटर कोर्टवर झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात विश्वातील अव्वल टेनिसपटू जोकोव्हिचने किरियॉसला 4-6, 6-3, 6-4, 7-3 (7-3) असं पराभूत केलं.