दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री धनुष हा त्याच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो.
धनुषनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील काम केलं आहे.
धनुषला बॉडी शेमिंगचा देखील सामना करावा लागला आहे. सेटवरील काही लोक त्याला रिक्षावाला म्हणत होते. धनुषनं त्याच्या या अनुभवाबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
2015 साली काधल कोंडेन या चित्रपटाच्या सेटवर करण्यात आलेल्या बॉडी शेमिंगबद्दल धनुषनं सांगितलं.
'काधल कोंडेन या चित्रपटाच्या सेटवरील काही लोक मला विचारत होते की, हीरो कोण आहे. मी दुसऱ्या कलाकाराकडे इशारा केला. पण जेव्हा त्यांना कळालं की मी हीरो आहे तेव्हा सेटवरील लोक हसत होते. ते मला रिक्षावाला म्हणत होते. मला तेव्हा खूप वाईट वाटलं. ' , असं धनुष म्हणाला.
धनुष पुढे म्हणाला, 'मी माझ्या कारमध्ये गेलो आणि रडायला लागलो. कारण मी तेव्हा लहान होतो. तिथे असा एकही व्यक्ती नव्हाता ज्यानं मला ट्रोल केलं नाही. '
धनुषचे पूर्ण नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. अभिनेता असण्यासोबतच तो निर्माता, दिग्दर्शक आणि पार्श्वगायक देखील आहे. त्यानं 46 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे
ऐश्वर्या आणि धनुष 2004 साली लग्नबंधनात अडकले होते. तसेच त्यांना दोन मुले आहेत. धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी घटस्फोटाबाबत माहिली दिली होती.
धनुषचा अतरंगी-रे हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
अतरंगी-रे चित्रपटात धनुषसोबत अभिनेत्री सारा अली खान आणि अक्षय कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.