भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात येत्या 7 जुलैपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं यापूर्वीच स्पष्ट केलंय.
दरम्यान, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या टी-20 खेळणार की नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रोहित शर्मा पहिल्या टी-20 मध्ये खेळण्याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं बर्मिंगहॅम कसोटी सामन्यापूर्वी लिसेस्टशायरविरुद्ध सराव सामना खेळला होता.
या सराव सामन्यादरम्यान रोहित शर्माची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याला बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं.
येत्या 7 जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. महत्वाचं म्हणजे, रोहित शर्माची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय.
रोहित शर्माचं पहिल्या टी-20 मध्ये खेळणं त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे.