‘आई कुठे काय करते’ फेम ‘संजना’ म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे. अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. अभिनेत्री रुपाली भोसलेचं लेटेस्ट फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोशूटसाठी रुपालीने खास लेव्हेंडर रंगाची साडी परिधान केली आहे. हलका मेकअप, सुंदर हेअरस्टाईल आणि केसांत मळलेले गुलाब सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. रुपालीचा हा दिलकश अंदाज चाहत्यांनाही आवडला असून, चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला जात आहे. छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अशातच या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले चर्चेत आली आहे. रुपाली भोसलेचा घायाळ करणारा अंदाज! रुपाली भोसलेचा घायाळ करणारा अंदाज!