साऊथ क्वीन अभिनेत्री नयनातारा हिने नुकतीच निर्माता-दिग्दर्शक विग्नेश शिवन याच्यासोबत लग्नगाठ बांधली. नवीनच लग्न झालेलं हे जोडपं सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. लग्न पार पडल्यापासून नयनतारा आणि विग्नेश शिवन आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रोमँटिक फोटो शेअर करत आहेत. नुकताच त्यांनी असाच एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. दोघांना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पाहून चाहते देखील खुश झाले आहेत. नुकताच विग्नेश शिवन याने एक फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत तो पत्नी-अभिनेत्री नयनतारा हिच्या मिठीत दिसत आहे. त्यांचे चाहते या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. हा फोटो पाहून दोघेही एकमेकांच्या प्रेमात आणि संसारात रमले आहेत, याची खुणगाठ पटते. विग्नेश शिवन याने हा फोटो शेअर करताना ‘Naan pirandha dhinamaey’ असे खास कॅप्शन दिले आहे. याचा अर्थ असा आहे की, तू माझा वाढदिवस आणखी खास बनवलास. चाहते या जोडीचा फोटो पाहून त्यांना कधीच नजर लागू नये, अशी प्रार्थना करत आहेत.