हिंदू धर्म ग्रंथामध्ये सुखी आणि समृद्ध जीवनासाठी काही नियम सांगितले आहेत. तुम्ही तुमच्या वडिलधाऱ्या माणसांकडून ऐकलं असेल की संध्याकाळच्या वेळी झोपू नये. पण संध्याकाळच्या वेळी का झोपू नये याबाबत सविस्तर जाणून घेऊया. असं म्हटलं जातं की संध्याकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी जर आपण झोपलो तर लक्ष्मी नाराज होते, अशी मान्यता आहे. यामुळे घरात लक्ष्मी येत नाही असं देखील म्हटलं जातं. तर जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी जर पुरेश झोप घेतलीत तर रात्री झोपण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो.