हल्ली लोकांच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं पाहायला मिळतं. लोकांचं आयुष्य हे फार धावपळीचं झालं असल्याचं पाहायला मिळतं. अशातच आपल्या सोयीनुसार गोष्टी करण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. मोठ्या शहरांमध्ये जागेची कमतरता निर्माण झाल्याने खोल्या देखील छोट्या असतात. त्यामुळे अनेकजण आपल्या फ्रिज हा बेडरुमध्ये देखील किंवा इतर गोष्टी ठेवतात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. अशातच यामधील गॅसमुळे अधिक धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी फ्रिज हा कायम मोकळ्या जागेमध्ये ठेवावा. फ्रिजमधून निघणाऱ्या उर्जेमुळे खोली अधिक गरम होऊ शकते. त्यामुळे तुमच्या खोलीमध्ये कार्बन डाय ऑक्साईड पसरण्याची देखील शक्यता असते.