उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्य़ाचदा दूध फ्रिजमध्ये ठेवले जाते. दूध फ्रिजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत समजून घेणे आवश्यक आहे. तसेच दूध फ्रिजमध्ये योग्य जागी ठेवणे आवश्यक आहे. फ्रिजमध्ये दूध हे दरवाज्याच्या बाजूला ठेवू नये दूध हे नेहमी फ्रिजच्या आतमध्ये ठेवावे. दूध फ्रिजमध्ये ठेवताना नेहमी झाकून ठेवावे. त्यामुळे दूध खराब होण्याची शक्यता फार कमी असते. दूध झाकून ठेवल्याने इतर पदार्थांचा वास देखील त्याला लागत नाही. त्यामुळे दूध जास्त काळ चांगले राहण्यास मदत होते. दूध झाकून ठेवल्याने त्याची चव देखील बदलत नाही.